घरव्हिडिओचंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका

चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर टीका

Related Story

- Advertisement -

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले, अशी घणाघाती टीका बावनकुळेंनी केली आहे. काल ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवारांच्या ताब्यात जर एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघू नये, असा टोलाही लगावला आहे.

- Advertisement -