आफताबने दिली होती ठार मारण्याची धमकी, 2 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये आफताबविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावेळी देखील आफताबने जीवे मारण्याची धमकी श्रद्धाला दिली असल्याचं कळतंय.