- Advertisement -
राज्यात शिंदे गटाने भाजपसोबत जात महासंत्तांतर घडवून आणलं. परंतु गेल्या ७ महिन्यांमध्ये राज्यात विधिमंडळाच्या ८ निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये एकही उमेदवार न उतरवता शिंदे गटाने केवळ भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. अंधेरी पोटनिवडणूक, शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणूक आणि सध्याची कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक यामध्ये अद्याप शिंदे गटाने उमेदवारच दिला नाही. शिंदे गटाला आपल्या अस्तित्वावरून प्रश्न पडला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- Advertisement -