‘वाळवी’ सिनेमासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वेची खास तयारी

‘वाळवी’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी ‘वाळवी’चे नवीन पोस्टरही झळकावले. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री शिवानी सुर्वेंनीदेखील चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली. सुबोध आणि स्वप्नीलप्रमाणे मलाही परफेक्टच काम करायचंय, अशी भावना शिवानीने यावेळी व्यक्त केली.