घरव्हिडिओबदलणाऱ्या झेंड्याबाबत मनसे कार्यकर्त्यांना काय वाटतं?

बदलणाऱ्या झेंड्याबाबत मनसे कार्यकर्त्यांना काय वाटतं?

Related Story

- Advertisement -

मनसे पक्षात सध्या मेगाभरती सुरू असून सोमवारी रायगड, खोपोली, सायन धारावी, अँटॉपहिल विभागातील शिवसेना- राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात बदल होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य असल्याची प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे. २३ जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांनी मनसेच्या एका महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. यावेळी राज ठाकरे हे मनसेची भूमिका आणि नवा झेंडा सर्वांसमोर आणणार असल्याचं वृत्त आहे. मनसेचा नवा झेंडा हा पूर्णपणे भगवा असल्याची चर्चा आहे. तसेच यावेळी राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -