Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा

धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा

Related Story

- Advertisement -

मराठा समाजानंतर आता धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास विरोध करण्याचा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने दिला आहे. धनगर आरक्षण कृती समितीची आज पंढरपुरातील अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या होळकर वाड्यात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवण्याच्या विचारत आहेत. याचा अधिवेशनात धनगर आणि धनगड हे एकच असून तसा ठराव या विशेष अधिवेशनात करून केंद्राकडे पाठवावा, असे केले तर समस्त राज्यातील धनगर समाज मुख्यमंत्र्यांचे स्वागत करेल. जर या विशेष अधिवेशनात धनगर समाजाचा ठराव केला नाही तर आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेला धनगर समाज विरोध करेल, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने दिला आहे.

- Advertisement -