Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मिडियम स्पायसी चित्रपटात स्पृहाची महत्वाची भूमिका

मिडियम स्पायसी चित्रपटात स्पृहाची महत्वाची भूमिका

Related Story

- Advertisement -

अभिनय, सूत्रसंचालन आणि कविता या तिन्ही क्षेत्रामध्ये लीलया मुसाफिरी करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिडियम स्पायसी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात स्पृहा जोशीची भूमिका छोटीच पण महत्वपूर्ण आहे. स्पृहा जोशी सोशल मीडियावर सक्रिय असते. मिडियम स्पायसी या चित्रपटाबद्दल आपल्या चाहत्यांना स्पृहाने सोशल मीडियावरूनच माहिती दिली. स्पृहाची प्रत्येक भूमिका ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. ती तिची प्रत्येक भूमिका उत्तमपणे साकारते. दरम्यान, या चित्रपटात स्पृहाच्या भूमिकेचा नेमका कोणता फ्लेव्हर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आणि स्पृहाच्या या मिडियम स्पायसी या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे

 

- Advertisement -

pruha informed her fans about the movie Medium Spicy on social media. Every role of Spruha is important for her fans and the audience. She fulfills every role perfectly. Meanwhile, it is important to know exactly what flavor the audience will get to see the role of Spruha in this film and how the audience responds to this medium spicy film of Spruha

- Advertisement -