घरव्हिडिओएसटी कर्मचारी आपल्या कुटुंबियांसोबत उतरणार रस्त्यावर

एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबियांसोबत उतरणार रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीत एसटी कामगार जिवाची बाजी लावून काम करीत असताना गेल्या तीन महिन्यापासून  वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदील झाले आहेत. अनेकाच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले आहे. त्यामुळे कुटुंबियांच्या  उपाशी मरण्याची पाळी आली आहे. उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाउलही उचलले आहे. एसटी कर्मचार्‍यांची एका पत्नीने एक व्हिडीओ तयार करत आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. वेतन कायद्यानुसार महामंडळाने वेळेवर वेतन देणे बंधनकारक असताना. निधी नसल्याचे कारण सांगून राज्यसरकारकडून मदत मागितली आहे. परंतु, या वेतनासाठी ती ही मिळेनाशी झालेली आहे. त्यामुळे जर शासनाने तत्काळ एसटी महामंडळाला मदत केली नाही तर आता एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबियांसोबत रस्त्यावर उतरण्याचा इशारा एसटी कामागार संघटनेकडून देण्यात आलेल्या आहे.

- Advertisement -