- Advertisement -
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रत्युत्तर दिल आहे. सरकार पडणार असल्यामुळे असा अर्थसंकल्प मांडला आल्याची टीका अजितदादांनी केली होती. यावर सुधीर मुनगंटीवारांनी पलटवार केला आहे. सरकार पडणार अशा भावनेतून अर्थसंकल्प मांडला असेल तर, त्यात वाईट काय आहे? लोकांचे जर यामध्ये हीत असेल तर वाईट काय? असा प्रतिप्रश्न मुनगंटीवारांनी केला आहे.
- Advertisement -