घरव्हिडिओसुमेध-संस्कृतीचा रोमॅण्टीक अंदाज

सुमेध-संस्कृतीचा रोमॅण्टीक अंदाज

Related Story

- Advertisement -

‘बेखबर कशी तू’ हा रोमॅन्टीक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अल्बममधून चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. डेहराडून, हृषिकेश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी या म्युझिक अल्बमचं चित्रीकरण झालं आहे. जयपाल वाधवानी यांनी या अल्बमचं दिग्दर्शन केलं आहे. लॉंन्च झाल्यावर ‘बेखबर कशी तू’ हा रोमॅन्टीक अल्बमला अल्पावधीतच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. श्रवणीय संगीत, अप्रतिम लोकेशन्स हे गाण्याचे य़ुएसपी ठरले आहेत. गाण्यात वापरलेल्या लोकेशन्स तुम्हाला नक्कीच प्रेमाता पाडतील. तर सुमेध आणि संस्कृतीच्या या रोमॅण्टीक अंदाजाची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. पहिल्यांदाच मराठी अल्बम अशा वेगळ्याप्रकारे प्रेक्षकांसमोर आला आहे. मराठी इंडस्टीमध्ये झालेले हे बदल प्रेक्षकांना नक्कीच आवडतील यात शंकाच नाही.

- Advertisement -