Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; सुनील प्रभूंचे रमेश पाटलांना प्रत्युत्तर

निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; सुनील प्रभूंचे रमेश पाटलांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेत बोलताना भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भूषण देसाईंबद्दलच्या विधानावर भाष्य केलं. ते म्हणाले, “कुणीतरी काल सांगितलं की, एमआयडीसीच्या प्लॉटची 400 कोटींची फाईल आहे म्हणून ते शिवसेनेत आले. पण ते त्यासाठी इथे आलेले नाहीत. हे सरकार चांगलं काम करत आहे. चांगला न्याय देत आहे म्हणून ते इथे आले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातमधून येते. त्यामुळे आम्ही साफसफाई करून घेतो. जो माणूस आमच्याकडे येईल, तो स्वच्छ होणार आहे”, असं रमेश पाटील म्हणाले. रमेश पाटील यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी त्यांना सत्तेचा माज असून आगामी निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -