घरव्हिडिओकल्याणमधील घटना, सुदैवाने जिवीतहानी नाही

कल्याणमधील घटना, सुदैवाने जिवीतहानी नाही

Related Story

- Advertisement -

कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोडवर असलेल्या सनराईस सोसायटीच्या तळमजल्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली असून या आगीमध्ये मोठा स्फोट झाल्याने आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे लोट दूरपर्यंत पसरायला लागले होते. स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

- Advertisement -