‘सुपर 50’ प्रकल्प घडवणार आदिवासी विद्यार्थ्यांचे आयुष्य

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी ‘सुपर 50’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना जेईई, आयआयटी सारख्या परीक्षांसाठी सज्ज केलं जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांची रीतसर परीक्षा घेऊन त्यातील टॉप 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे