Saturday, November 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना फटकारलं

सुप्रिया सुळेंनी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना फटकारलं

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना फैलावर घेतलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापकांच्या पगारावरून केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. जेव्हा एखादा मंत्री बोलतो तेव्हा हलक्याने घ्यायचे नसते. गंमत जंमत करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ही महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. त्यामुळे भाषण करताना तुम्ही विचार करुन बोललं पाहिजे, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची? असा सवालसुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

- Advertisement -