घरव्हिडिओवैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

Related Story

- Advertisement -

१ जून २०२० रोजी नौपाडा येथील ज्युपिटर स्कॅन सेंटर समोरच्या फ्लायओव्हर खालच्या मोकळ्या जागेत वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचे येथील जागरूक नागरिक सचिन सकपाळ यांच्या नजरेस पडले. यंत्रणांना संपर्क करून सुद्धा सुमारे १०.३० वाजेपर्यंत तो कचरा तसाच तिथे पडून होता. येथून जवळच २ मोठी इस्पितळे आहेत. इथे सतत रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची ये-जा सुरू असते. रुग्णवाहिका याच ठिकाणी पार्क केल्या जातात. हा कचरा इथे जेव्हापासून पडला असेल त्याने किती जणांना संसर्ग झाला असेल हे अज्ञात आहे. या दरम्यान भटकी कुत्री, मांजरी, उंदीर, घुशी व कावळे याला शिवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड हा प्राण्यांना होऊ शकतो, हे या अगोदरच सिद्ध झालेले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून संसर्ग पसरू नये, याकरिता नागरिकांना घ्यावयाची काळजी नियमावली प्रसिद्ध केली जाते. परंतु याप्रकारे काही असामाजिक देशद्रोही वृत्तीकडून अशाप्रकारे त्याचे हनन होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. यावर पोलिसांनी चौकशी करून या बेजबाबदार लोकांना पकडून जबर शिक्षा करणे अपेक्षित आहे. तसेच नवीन कोविड नियमावलीच्या आधारे घरोघरी मास्क ग्लोव्हजचा जमा होणारा कचरा गोळा करून विल्हेवाटीसाठी घंटागाडी सारखी विशेष यंत्रणा उभारणे आजच्या घडीला अत्यावश्यक आहे.

- Advertisement -