घरव्हिडिओठाणे करोनाशी दोन हात करायला सज्ज

ठाणे करोनाशी दोन हात करायला सज्ज

Related Story

- Advertisement -

ठाणे महापालिका करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असून हा आजार पसरणार नाही याची काळजी घेत असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त विजय सिंघल यांनी माय महानगरशी बोलताना सांगितले. ठाण्यात अद्याप तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक पूर्णपणे बरा झाला आहे. पालिकेची संपूर्ण टीम संसर्ज झालेल्यांच्या संपर्कात किती जण आली याच्या शोधात आहेत. तसेच ताप खोकल्याचे त्रास होणाऱ्यांना होम क्वारंटाइन करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. सुदैवाने करोनाचे केसेस कमी आहेत. मात्र पुढे गरज पडल्यास प्रशासन या आजाराशी लढण्यास सज्ज आहे. कासारवडवली येथे जवळपास १०० रुम्सची व्यवस्था विलगीकरणासाठी केली असून कल्याणमध्येही १७० जणांसाठी रुम्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्येही सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

- Advertisement -