घरव्हिडिओभगवती हॉस्पिटलचा आयसीयू विभाग सुरू होणार

भगवती हॉस्पिटलचा आयसीयू विभाग सुरू होणार

Related Story

- Advertisement -

बोरिवली येथील भगवती रुग्णालयात गेले दोन वर्षापासून बंद असलेला आयसीयु विभाग येत्या सोमवारपर्यंत तात्काळ सुरू करण्यात येणार असून तेथे तातडीने बेड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी  दिली. तसेच रुग्णालयात सध्या तुटवडा असलेली इंजेक्शनसुद्धा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याची माहितीही दरकेर यांनी यावेळी दिली. रुग्णालयातील आयसीयु विभाग तातडीने सुरु करण्याची मागणी दरेकर यांनी आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे दूरध्वनी वरुन केल्यानंतर सोमवारपासून रुग्णालयाचा आयसीयु विभाग सुरु करण्यात येईल, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -