‘द केरला स्टोरी’ सिनेमावरून राजकीय वादंग निर्माण झालाय. केरळ मधील मुलींचे अपहरण करून त्यांचा ब्रेनवॉश करुन कशा प्रकारे ISISसंघटनेत दाखल केलं जातं ही स्टोरी यात मांडण्यात आलीये. लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारख्या संवेदनशील मुद्द्यावर फोकस करण्यात आलाय मात्र पश्चिम बंगाल, तमिळनाडू सारख्या राज्यात सिनेमावर बंदी घालण्यात आलीये तर उत्तरप्रदेश मध्ये सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र राजकीय पक्ष आमने सामने आलेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट सिनेमा तयार करणाऱ्याला चौकात फाशी दिली पाहीजे असं विधान केलं मात्र शाब्दिक उद्वेगातून मी बोललो असल्याचे म्हणत यू टर्नही घेतला मात्र सध्याच्या घडीला सिनेमावरून राजकीय नेतेमंडळी यांच्यात जुंपली असल्याचे दिसतेय..
The Kerala Story सिनेमावरुन राजकीय घमासान
Related Story
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement