घरव्हिडिओप्रवाशांनी बुरशीवाले जेवण दिले टाकून

प्रवाशांनी बुरशीवाले जेवण दिले टाकून

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी प्रवासी मजुरांना घेऊन जाणारी एक ट्रेन केरळवरून दानापुरा येथे निघाली होती. ही ट्रेन पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्थानकावर पोहोचताच तेथे मजुरांना जेवण आणि पिण्याचे पाणी देण्यात आले. पण लोकांनी त्यांना दिलेले जेवण खिडकीबाहेर टाकून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांना देण्यात आलेले जेवण हे शिळे असून बुरशी लागलेले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी हे जेवण टाकून दिल्याचे समजते. मात्र प्लॅटफॉर्मवर असे जेवण टाकून स्वच्छतेचे तीनतेरा वाजले, त्याच काय.याला अन्न पुरवणारे रेल्वे प्रशासन जबाबदार आहेत की स्वःता प्रवासी, हे मात्र अस्पष्ट राहिले आहे.

- Advertisement -