घरव्हिडिओपालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला संकल्प

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला संकल्प

Related Story

- Advertisement -

“कोरोनाची येणारी तिसरी लाट गंभीर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी, परळी सज्ज असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल आहे. त्या बरोबरच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही”, असा संकल्प देखील मुंडे यांनी केला आहे. परळी शहरातील हलगे गार्डनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या २४ तास सेवा देणाऱ्या “हातांचा गौरव, “सेवा गौरव समारोहा” च्या माध्यमातून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमा मध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेवक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार यासह कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या दूतांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला.

- Advertisement -