- Advertisement -
सोमवार 6 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वनडे वर्ल्डकपचा 38 वा सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झाला. हा सामना बांगलादेशने जिकला असला तरी, या सामन्यात दोन संघांमधील अनेक वाद पाहायला मिळाले. यामधील एक वाद असा होता की, श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआऊट होणारा तो पहिला फलंदाज ठरला.
- Advertisement -