२०२२ चे स्वप्न दाखवणाऱ्या मांत्रिकापासून तुम्हाला सोडवायचंय | उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली. कुणी तरी मांत्रिक येतो आणि म्हणतो २०२२ साली तुम्हाला हे देतो, ते देतो असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘वास्तव कुपोषणाचं’ या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला इकडेही मांत्रिकापासून तुम्हाला सोडवायचं आहे आणि तिकडेही. तसेच जे मांत्रिक २०२५ पर्यंतचा अंगारे-धुपारे देऊन मंत्र देतात. त्यावर आता उपाय योजना करायची आहे.