Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख होणार? कार्यकारिणी निवड करणार

उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख होणार? कार्यकारिणी निवड करणार

Related Story

- Advertisement -

शिवसेना (उबाठा) म्हणजेच ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १८ जूनला होणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे सर्व नेते, राज्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षाच्या पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्ष आणि चिन्ह वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून कार्यकारिणीची पुन्हा बांधणी करण्यात येणार आहे. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची निवड नव्याने करण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेच्या वर्धापनदिनी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -