Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्रिपदाचा 'त्यांना' अभिमान आला- प्रतापराव जाधव

मुख्यमंत्रिपदाचा ‘त्यांना’ अभिमान आला- प्रतापराव जाधव

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाचे खासदार ‘प्रतापराव जाधव’ यांनी उद्धव ठाकरेंंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्रिपदाचा त्यांना एवढा अभिमान आला झाला की ते कधी घराच्या बाहेर गेले नाही. जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, तेव्हा अजित पवार सत्ता गाजवत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की, शरद पवार ब्रह्मदेव आहेत आणि त्यांनी कुठल्याही समस्येवर जादूची कांडी फिरवली की समस्या दूर होतात. महाराष्ट्रात सर्वात आधी गद्दारीचं बीज कोणी रोवली असतील तर ते शरद पवार आहेत, असा गंभीर आरोप देखील प्रतापराव जाधव यांनी केला. दरम्यान, अनेकांनी शिंदे गटाने गद्दारी केल्याचं म्हणलं पण तो आमचा उठाव होता, असं देखील प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.

- Advertisement -