Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उद्धवजींनी योगींची माफी मागावी

उद्धवजींनी योगींची माफी मागावी

Related Story

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीचे सक्रीय कार्यकर्ता असलेले राजू मेहरोत्रा आणि उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरचे महामंत्री बाबा राम यादव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जनसुनवाई पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मे २०१८ मध्ये निवडणूकीच्या कालावधीत पालघर दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. मला शक्य झाले तर मी योगींनी चप्पलने मारेन असे विधान त्यांनी केले होते. योगी आदित्यनाथ हे फक्त मुख्यमंत्री नाहीत, तर ते संत समाजाचेही प्रतिनिधीत्व करतात. या प्रकारे अपमान करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरही दंडात्मक आणि योग्य कारवाई झाली पाहिजे. तसेच उद्धव ठाकरे यांनी योगीजींची माफी मागितली पाहिजे.

- Advertisement -