Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माहेरी गेलेल्या बायकोसाठी दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर 4 तास मुक्काम

माहेरी गेलेल्या बायकोसाठी दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर 4 तास मुक्काम

Related Story

- Advertisement -

माहेरी गेलेल्या बायकोला परत आणण्याच्या मागणीसाठी एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकला आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडलीय. गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दारूच्या नशेत गणपत बकाल हा 4 वाजताच्या सुमारास गावातीलच मोबाईल टॉवरवर चढला. काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर मात्र अग्निशमन दलाचे पथक मागविण्यात आले मात्र तेही हतबल झाले. तब्बल 4 तासाने हा तरुण टॉवर खाली उतरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

- Advertisement -