घरव्हिडिओकल्याण डोंबिवलीत अतिवृष्टीचा इशारा

कल्याण डोंबिवलीत अतिवृष्टीचा इशारा

Related Story

- Advertisement -

येत्या चार दिवसात कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर उभारण्यात आलेली तीन भलीमोठी होर्डिंग कोसळून काही जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळातही अशा दुर्घटना होऊ नये, यासाठी धोकादायक असणारी सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीही तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. तसेच रुग्णालयांनी जनरेटरसाठी अतिवृष्टीच्या काळात ३ दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच गोविंदवाडीसारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीच्या काळात पाणी शिरण्याआधीच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील बाजूस आणि रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -