मॅनोपॉजमध्ये आणि नंतर बऱ्याच जणींना अंगावर अतिरक्तस्त्राव होतो. तर काहीजणांना गर्भाशयात गाठी होतात. तर काहीजणींना सतत अंगावर सफेद पाणी जाण्याचा त्रास होतो. अशावेळी न घाबरता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. त्यानुसार उपचार करावेत. पण बऱ्याचजणीं घाबरून गर्भाशयच काढण्याचा हट्ट धरतात. जो योग्य नसून अशी मोठी शस्त्रक्रिया गरज नसताना करणे शक्यतो टाळावे. पण डॉक्टरांनी दिलेला सल्ल्यानुसारच योग्य तो उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर निवेदिता पवार यांनी दिला आहे.