- Advertisement -
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयित आरोपी वनमंत्री संजय राठोडांविरोधात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणानंतर भाजपाचे अनेक नेते ठाकरे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यात चित्रा वाघ यांनी अधिक आक्रमकतेने हा मुद्दा लावून धरला आहे. संजय राठोडांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या चित्रा वाघ कोण आहेत आणि त्यांची कारकिर्द काय आहे हे जाणून घेऊया.
- Advertisement -