Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ महापालिकेचे बोगस आयकार्ड बनवणे आले अंगलट!

महापालिकेचे बोगस आयकार्ड बनवणे आले अंगलट!

Related Story

- Advertisement -

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाने एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवास सर्वसामान्यांना बंद करत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, रस्ता प्रवास परवडत नसल्याने अनेक नागरिक रेल्वे प्रवासाची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रवाशांना हेरून त्यांना अत्यावश्यक सेवेतील बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्या २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुण धनंजय बनसोडे याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ बनावट ओळखपत्रासह ओळखपत्र तयार करण्याचे फॉर्म आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा स्ट्म्प आणि सही शिक्का पोलिसांनी जप्त केला आहे. रेल्वे न्यायलयाने या आरोपीला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

- Advertisement -