घरमहाराष्ट्रपवार उभे राहिले तरी १०० टक्के निवडणूक लढवणार - बिचुकले

पवार उभे राहिले तरी १०० टक्के निवडणूक लढवणार – बिचुकले

Subscribe

राजकारण आणि मनोरंजन दोन्ही क्षेत्रात वादग्रस्त वक्तव्य करणारे मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाने खळबळ माजवली आहे. साताऱ्यातून माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधत लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या बिचुकले यांनी शरद पवार जरी निवडणुकीला उभे राहिले तरी १०० टक्के लढणार असल्याचे म्हटले आहे. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर नवीन पक्षाच्या घोषणेची माहिती बिचुकले यांनी यावेळी दिली.

काय म्हणाले अभिजित बिचुकले

अभिजीत बिचुकले हे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात लढल्याने चर्चेत आले होते. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानंतर साताऱ्यातून शरद पवार लढणार असतील तर आपण निवडणुकीतून माघार घेण्याचे भावूक वक्तव्य केले होते. यावरून शरद पवार पोटनिवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत. यावर अभिजीत बिचुकले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत भाष्य करताना म्हटले आहे की, उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आले आहेत. तरी त्यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो. तर मग शरद पवारांना का सोडू? पवार उभे राहिले तर १०० टक्के लढणार. तसेच लोकसभा लढणे अधिक योग्य वाटते. माझं हिंदी आणि इंग्रजी अधिक चांगले आहे, असेही बिचुकले यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी अखिल बहुजन समाज सेना पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. अभिजीत बिचुकले हे अखिल बहुजन समाज सेनेचे सचिव आहेत. तसेच विधानसभेच्या २८८ जागा लढणार असल्याचे सांगताना त्यांनी निवडणूक लढण्यास इच्छुक कार्यकर्त्यांना संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

- Advertisement -

बिचुकले मुख्यमंत्र्यांविरोधातही बरळले 

छत्रपती उदयनराजे यांचे शरद पवार यांच्यावर एवढे प्रेम होते, तर मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली?, असा प्रश्न अभिजित बिचुकले यांनी यावेळी केला. निवडणुकीत मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी त्यांनी शरद पवारांवर प्रेम दाखवले आहे’’, असा आरोप बिचुकले यांनी केला. शरद पवार यांच्या विरोधात मला एक मतही पडले नाही तरी चालेल पण त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार, असेही बिचुकले यांनी स्पष्ट केले. उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टिका केली. शरद पवार यांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला आहे. त्यांच्याविरुद्ध आत्ताच का गुन्हा दाखल केला गेला? यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही?, राज ठाकरे हे विरोधात बोलू लागल्यानेत त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. ज्याची नगरसेवक होण्याची कुवत नाही, त्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी जरी मी मुख्यमंत्री होऊ शकत नसलो तरी पुढील २०२४ च्या निवडणुकीत मी नक्की मुख्यमंत्री होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा –

मी स्वतः शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -