घरमुंबईMaharashtra Assembly Poll: आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या बिचुकलेंना पहिल्या फेरीत एकही मत...

Maharashtra Assembly Poll: आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या बिचुकलेंना पहिल्या फेरीत एकही मत नाही!

Subscribe

आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभ्या राहिलेल्या अभिजित बिचुकलेंना पहिल्या फेरीत एकही मत पडलेलं नाही.

वरळीतून शिवसेनेचे पहिले ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असताना बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. एरवी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहणाऱ्या बिचुकलेंनी यंदा मात्र थेट आदित्य ठाकरेंनाच आव्हान दिलं होतं. मात्र, प्रत्यक्ष मतदानावेळी पोस्टल मतदान आणि पहिल्या फेरीअखेरीस हाती आलेल्या आकडेवारीनुसार अभिजित बिचुकलेंना पहिल्या फेरीअखेर एकही मत मिळालेलं नाही. त्याउलट त्यांच्यासमोर उभे असलेले आदित्य ठाकरे यांना तब्बल ७ हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे वरळीतून आदित्य ठाकरेंचा विजय ही औपचारिकता असल्याचं जे निवडणुकीआधी म्हटलं जात होतं, तो अंदाज खरा ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE अपडेट

बिग बॉसमध्ये घातलेला गोंधळ, चालू शोमधूनच पोलिसांनी बँकेचा चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणी केलेली अटक आणि त्यानंतर वाढलेला आत्मविश्वास या जोरावर अभिजित बिचुकले यांनी थेट वरळीतून आदित्य ठाकरेंनाच आव्हान दिलं होतं. यंदा पहिल्यांदाच त्यांनी साताऱ्याव्यतिरिक्त दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज भरला होता. मात्र, साताऱ्याप्रमाणेच वरळीत देखील अभिजित बिचुकले फक्त चर्चेतच राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -