घरमुंबईआज आदित्य ठाकरे भरणार उमेदवारी अर्ज

आज आदित्य ठाकरे भरणार उमेदवारी अर्ज

Subscribe

आज, गुरुवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते उपस्थित रहाणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित रहाणार असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे. महायुतीचं एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना केलं जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रचार रॅली सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास लोअर परळ येथील ‘शिवालय’ या शिवसेना शाखा येथून सुरु होईल आणि बीएमसी इंजिनियरिंग हबच्या तळ येथे संपेलय. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास वरळी हिल रोड येथील जरीमरी माता मंदिर येथून सुरु होईल.

हेही वाचा – भाजपकडून एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी?

- Advertisement -

असा असेल प्रचार रॅलीचा मार्ग

१) लोअर परळ येथील ‘शिवालय’ शिवसेना शाखा येथून आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरायला निघणार.
२) गणपतराव कदम मार्ग
३) श्री राम मिल
४) बीडीडी चाळ
५) शिवराम अमृतवार मार्ग
६) बनसोडे मार्ग
७) भागोजी वाघमारे मार्ग
८) देवरूखकर मार्ग
९) बीडीडी चाळ क्रं. ६१ आणि ४०
१०) भोसले मार्ग
११) वरळी नाका
१२) डाँ. ई मोझेस मार्ग
१३ बीएमसी इंजिनियरींग हब
१४ ) बीएमसी इंजिनियरिंग हबच्या तळ मजल्यावरील निवडणुक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -