घरमुंबईशरद पवारांचं नाव गोवल्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला - अजित पवार

शरद पवारांचं नाव गोवल्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला – अजित पवार

Subscribe

गेल्या तीन दिवसांपासून आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांचीच चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असताना अचानक राजीनामा दिल्यानंतर अजित पवार गायब झाले. गेल्या १८ तासांपासून अजित पवार यांचा कुणाशीही संपर्क नव्हता. राजीनामा दिल्यानंतर स्वत: शरद पवारांनी देखील त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्यांच्या गायब होण्याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपच्या गोटात जाणार अशा चर्चांना देखील ऊत आला होता. अखेर, आज सकाळी शरद पवारांसोबत त्यांचं बोलणं झालं आणि नंतर त्यांनी माध्यमांशी बोलून त्यांची भूमिका स्पष्ट केली.


हेही वाचा – ..आणि पत्रकार परिषदेत अजित पवारांना झाले अश्रू अनावर!

नक्की काय म्हणाले अजित पवार पत्रकार परिषदेत? वाचा प्रत्येक मुद्दा:
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -