घरमहाराष्ट्रबारामतीत अजित पवारांचा मोठा विजय, भाजपच्या 'ढाण्या वाघा'चं डिपॉझिटही जप्त!

बारामतीत अजित पवारांचा मोठा विजय, भाजपच्या ‘ढाण्या वाघा’चं डिपॉझिटही जप्त!

Subscribe

अजित पवारांनी बारामतीमध्ये अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट देखील जप्त झाल्यामुळे बारामती पवारांचाच बालेकिल्ला ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

ऐन विधानसभा निवडणुकांच्या आधी आमदारकीचा राजीनामा देऊन ‘या राजकारणामुळे निराश झालो आहे’, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये अपेक्षेप्रमाणे मोठा विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या विरोधात निवडणुकीत उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालं आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करत बारामतीमधून तिकीट दिलेल्या गोपीचंद पडळकर यांचं देखील डिपॉझिट जप्त झालं आहे. यामुळे भाजपला मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. ‘ढाण्या वाघ’ म्हणून ज्या पडळकरांना भाजपमध्ये प्रवेश देऊन तिकीट दिलं, त्यांना डिपॉझिट देखील वाचवता न आल्यामुळे बारामतीमध्ये पवारांना आव्हान देणं महाकठीण असल्याचंच पुन्हा एकदा या निवडणुकीतून समोर आलं आहे.

शिवतारेंना दिलेला इशारा खरा ठरला!

दरम्यान, बाजूच्याच पुरंदर मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे विद्यमान मंत्री विजय शिवतारे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकांवेळी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना विजय शिवतारे यांच्याशी त्यांचं शाब्दिक युद्ध रंगलं होतं. ‘विधानसभेला कसा निवडून येतो, तेच बघतो’, असा उघड इशाराच त्यांनी दिला होता. तो इशारा आता खरा ठरला असून विजय शिवतारेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -