घरमहाराष्ट्रमोदींच्या सभेमुळे अमोल कोल्हेंच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा रद्द!

मोदींच्या सभेमुळे अमोल कोल्हेंच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा रद्द!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा रद्द करण्यात आल्या. दरम्यान, ‘प्रोटोकॉलच्या नावाखाली इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. इतर पक्षांना प्रचार करण्यास नाकारलं जात आहे. हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे?’ असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

अमोल कोल्हेंनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये सभा आयोजित केल्या होत्या. मात्र, ऐन वेळी सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे परिसरात असल्याने सभेला येऊ शकलो नाही. हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आली. चोपडा, पाईट, भोसरी, पिंपरी, चिंचवड येथील सभा रद्द झाल्या. पुणे परिसरात पंतप्रधान असल्याने उड्डाण करण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आली. पण खरोखर प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही की, जर देशाचे पंतप्रधान पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील, तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून का वंचित ठेवण्यात येत आहे?’

- Advertisement -

‘इतर पक्षांना प्रचार करण्यास नाकारल जात आहे, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे? याविषयी संभ्रम निर्माण होत आहे’, असं देखील अमोल कोल्हे म्हणाले. सभा रद्द झाल्याने खासदार अमोल कोल्हे यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित झालेल्या नागरिकांची माफी मागितली आहे. खेड आळंदी, भोसरी, पिंपरी, चिंचवड येथील उमेदवारांना शुभेच्छा देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -