घरमहाराष्ट्रशरद पवार म्हणतात, 'अभी तो मै जवान हूँ'

शरद पवार म्हणतात, ‘अभी तो मै जवान हूँ’

Subscribe

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी आपल्या मनोगतात जेव्हा शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करून त्यांच्या धडाडीचे कौतुक केले. त्यावेळी पवारांनी 'अभी तो मैं जवान हूँ', असे मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले.

तळेगावात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सायंकाळी सभाझाली होती. या सभेला ‘न भूतो, न भविष्यती’, अशी विक्रमी गर्दी झाली होती. त्यानंतर दिग्गज नेत्यांची देखील भाषणे झाली. पण त्या संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही चर्चा राहिली ती फक्त शरद पवार यांचीच, ‘वय अवघे पाऊणशे’ हे विशेषण खोटे ठरवणाऱ्या या सदाबहार व्यक्तिमत्त्वाची जनमानसावरील जादूच, अशी आहे कि यांचा शब्दन शब्द कानात साठवण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात. मात्र, शुक्रवारच्या सभेत तर तरुणाईने देखील तुफान गर्दी करून महाराष्ट्रातील या मातब्बर नेत्याच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला जणू मानाचा मुजराच दिला.

काय मामला काय आहे?

मिश्किल शैलीत विरोधकांचा समाचार घेऊन त्यांना ‘क्लीन बोल्ड’ करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शरद पवार यांनी या सभेतही आपल्या चौफेर फटकेबाजी केली. सुरुवातीलाच त्यांनी समोर उपस्थित विराट जनसमुदायाकडे पाहून ‘काय मामला काय आहे?’ असे मिश्किल शब्दात विचारले. ‘मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरतो आहे, पण तळेगावातली गर्दी पाहून माझा विश्वासच बसत नाही. तरुण आणि महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून आश्चर्य वाटले’, अशा शब्दात त्यांनी या सभेचे वर्णन केले. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी आपल्या मनोगतात जेव्हा शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करून त्यांच्या धडाडीचे कौतुक केले, तेव्हा त्यांना पवारांनी पुन्हा आपल्या मिश्किल शैलीत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘कोण म्हणतंय मी म्हातारा आहे? अभी तो मैं जवान हूँ!’ त्यांच्या या वाक्यावर टाळ्या-शिट्ट्या न पडते तरच नवल.

पवारांची ‘पॉवर’ संपूर्ण देश जाणतो

शरद पवारांची ‘पॉवर’ केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश जाणतो. राजकारण कोळून प्यालेल्या शरद पवारांचा परिसस्पर्श ज्या नेत्याला लागतो, त्याच्या आयुष्याचे सोने झालेच म्हणून समजा! अशा या दिग्गज नेत्याला गेल्या काही महिन्यांपासून स्वपक्षीयांकडूनच दगा मिळत आहे. मात्र, काहीही झाल तरी हिंमत हरायचे नाही, असच पवारांनी ठरवलंय. म्हणूनच रात्रंदिवस न थकता महाराष्ट्रभर त्यांनी जाहीर सभांचा धडाका लावलाय. तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची स्फूर्ती, बेधडक वागणे आणि पक्ष जागवण्यासाठीची त्यांची आंतरिक तळमळ कोणापासूनही लपून राहत नाही. म्हणूनच युवावर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. तरुणवर्गात वयाच्या ऐंशीव्या वर्षीही आपली ‘क्रेझ’ निर्माण करणारे शरद पवार हे एकमेव नेते असावेत.

मावळसाठी हाच कारभारी योग्य

सुनिल शेळके यांचे धडाडीचे कार्य, तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेली धडपड, स्वखर्चाने कामे करण्याची तयारी, अशा अनेक गुणांचा विचार करून मावळसाठी हाच कारभारी योग्य असल्याचे शरद पवारांनी हेरले आणि त्यांनी शेळकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली. ही उमेदवारी सार्थ असल्याची खात्री शुक्रवारच्या सभेत पवारांनाही पटली. त्यामुळेच त्यांनी मावळवासीयांना ‘तुमच्या मनातला उमेदवार दिलाय, त्याला निवडून आणा’ असे आवाहन केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -