घरमहाराष्ट्रयवतमाळमध्ये भाजपचाच वरचष्मा

यवतमाळमध्ये भाजपचाच वरचष्मा

Subscribe

यवतमाळ लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा क्षेत्रांपैकी ४ विधानसभांमध्ये भाजपचा आमदार आहे, तर एक शिवसेना व १ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यावर भाजपचाच वरचष्मा आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीतच भाजपचेच वजन कायम असणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यावर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी उत्तम प्रकार नियंत्रण मिळवले आहे.

म्हणून मदन येरावार हे हेविवेट राज्यमंत्री म्हणून ओळखले जात आहेेत. त्यांचा राजकीय प्रवास यवतमाळ नगर परिषदेचे नगरसेवक ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री असा चढता आहे. ते पाच वेगवेगळ्या खात्याचे राज्यमंत्री आहेत. यवतमाळ विधानसभेची निवडणूक सुरुवातीपासून नेहमीच आरपारची लढाई राहिली आहे.

- Advertisement -

2004 साली भाजपचे मदन येरावार हे या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2009 साली पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचे मैदान काबीज केले. दरम्यान आमदार निलेश पारवेकर यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली त्या 2013 च्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदन येरावार यांचा पराभव केला. त्या यवतमाळ विधानसभेच्या महिला आमदार झाल्या.त्यानंतर यवतमाळचे राजकीय वातावरण पुन्हा बदलले आणि 2014 मध्ये भाजपच्या मदन येरावार यांनी या अटीतटीच्या लढाईत बाजी मारली.

भाजप -शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. अशावेळी शिवसेनेला येथील जागा मिळावी यासाठी शिवसैनिक प्रयत्नशील आहेत. शिवसेनेकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी संतोष ढवळे तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचे नाव चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. त्यासाठी ते वेळ काळ सोडून वंचितचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

- Advertisement -

यवतमाळ-वाशिम
वाशिम – लखन मलिक – भाजप – ४८, १९६
कारंजा – राजेंद्र पटनी – भाजप – ४४, ७५१
राळेगांव – अशोक उके – भाजप – १,००, ६१८
यवतमाळ – मदन येरेवार – भाजप – ५३, ७७१
दिग्रस – संजय राठोड – शिवसेना – १,२१,२१६
पुसद – मनोहर नाईक – राष्ट्रवादी – ९४,१५१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -