घरमुंबईडहाणूत भाजपसमोर माकपची कसोटी

डहाणूत भाजपसमोर माकपची कसोटी

Subscribe

मतदारसंघाची फेररचना, माकपमधील अंतर्गत बंडाळी आणि मोदी लाटेने डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतला. आता तर माकपची तशी फारशी ताकद राहिलेली नाही. सध्या तरी माकपचाच या जागेवर दावा असून भाजपचे विद्यमान आमदार पास्कल धनारे यांच्यासाठी ही लढाई फारशी कठीण वाटत नाही.

2009 ला मतदारसंघाचे विभाजन होऊन नवा डहाणू विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यातून विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा वगळून डहाणूचा समावेश झाला. पूर्वीच्या मतदारसंघात माकपचा दबदबा होता. राजाराम ओझरे आणि रामजी वरठा यांनी दोन-दोन वेळा विजय मिळवला होता. पण, मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर माकपला ग्रहण लागले आणि आता तर माकपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

विभाजनानंतर झालेल्या 2009 च्या पहिल्या निवडणुकीत माकपचे राजाराम ओझरे यांनी विजय मिळवून माकपचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कृष्णा घोडा आणि शिवसेनेचे ईश्वर धोडी यांचा त्यांनी पराभव केला होता. इथपर्यंत भाजपचे अस्तित्व विधानसभा जिंकण्याइतके नव्हते. पण, माकपमध्ये फुटीचे ग्रहण लागले. त्यातच विभाजनामुळे विक्रमगड आणि जव्हार, मोखाडयाची ताकद कमी झाली. डहाणू आणि परिसरात माकपचे तसे फारसे अस्तित्व नव्हते. त्या परिसराचा नव्या मतदारसंघात झालेल्या समावेशही माकपला मारक ठरला.

2014 च्या निवडणुकीत माकपमधील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली. माकपमध्ये एका व्यक्तीला दोनदाच संधी देण्याची प्रथा आहे. पक्षाने नकार दिल्याने दोन्ही गटांनी बंडखोरी केली. पक्षाने बारक्या मांगात यांना मैदानात उतरवले. त्यामुळे ओझरे आणि वरठा गटाने बंडखोरी केली. ओझरे यांचा पुत्र सुधीर ओझरे अपक्ष म्हणून तर रामजी वरठा हेही अपक्ष म्हणून मैदानात उतरले. दुसरीकडे, भाजपनेही मैदानात उडी घेतली. भाजपने तलासरी येथील पास्कल धनारे यांना मैदानात उतरवले. काँग्रेसचे माजी मंत्री शंकर नम यांनी शिवसेनेत प्रवेश घेत निवडणुकीत उडी घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने काशिनाथ चौधरी यांना मैदानात उतरवले. बहुरंगी लढतीत भाजपचे पास्कल धनारे यांनी माकपच्या बारक्या मांगात यांचा 24 हजार 700 च्या फरकाने पराभव केला.

- Advertisement -

बंडखोरीमुळे मांगात यांना पराभव पत्करावा लागला. सुधीर ओझरे यांना 12 हजार 968 तर दोन वेळा आमदार असलेल्या रामजी वरठा यांना अवघी 2 हजार 187 मते मिळाली. या दोघांमुळे मतविभाजन होऊन धनारे यांचा विजय सोपा झाला. गेल्या पाच वर्षांत माकपची ताकद तशी क्षीण झाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फुटीची लागण लागली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत डहाणू मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावीत पिछाडीवर होते. त्यामुळे धनारे यांच्याविरोधात पक्षातून नाराजीचा सूर निघत होता.

पण, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सोबत घेऊन धनारे यांनी राष्ट्रवादीलाच खिंडार पाडले. राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांचा मुलगा करण सध्या भाजपच्या वाटेवर आहे. तर माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक मिहीर शाह, शमी पिरा, भावेश देसाई, राजेंद्र माच्छी या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना डहाणूतील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले आहेत. हा गट आमदार आनंद ठाकूर यांचा समर्थक आहे. ठाकूर सध्या राष्ट्रवादीत असले तरी भाजपच्याच मार्गावर आहे. डहाणू नगरपरिषद भाजपच्या ताब्यात असून नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी याभागात बर्‍यापैकी वर्चस्व तयार केले आहे.

डहाणूत भाजपसमोर माकपची कसोटी
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -