घरमुंबईशिवा शेट्टीला बाजूला वळवून सुनील राणेंचे पाऊल पुढे!

शिवा शेट्टीला बाजूला वळवून सुनील राणेंचे पाऊल पुढे!

Subscribe

 विधानसभा निवडणुकीसाठी बोरिवली मतदार संघातून यावेळी वरळीचा गड लढवणार्‍या, पण विजयाने हुलकावणी दिलेल्या सुनील राणेंना भाजपने तिकीट दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा करुन तिकीट दिलेल्या राणेंना शिवा शेट्टी यांनी आव्हान दिले होते. परंतु मुंडेंच्या तालमीत तयार झालेल्या राणेंनी ‘गोपीनाथ तंत्राने’ शेट्टींना स्वत:च्या बाजूला वळवून घेतले आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी सुमारे २५-३० हजार मते घेऊन भाजपची डोकेदुखी वाढवली असती.

आधी काँग्रेस पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना आपल्या बाजूला वळवल्यावर थेट शेट्टी यांना आपल्या सोबत घेतल्यामुळे राणे यांचे एक पाऊल पुढे पडले आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपाच्या अर्धशतकी वाटचालीचा झेंडा फडकावण्याचा वेगळा दबाव राणेंवर आहेच. त्याचबरोबर खासदार गोपाळ शेट्टी यांनी मिळवलेल्या १,१३,००० मतांच्या आघाडीत घट होऊ नये म्हणून आपले सर्वस्व अर्पण करावे लागणार आहे.

- Advertisement -

बोरिवली पश्चिम विधानसभा मतदारसंघरातून राम नाईक तीन वेळा, हेमेंद्र मेहता तीन वेळा आणि गोपाळ शेट्टी दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.याच भागातून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पोचलेल्या गोपाळ शेट्टी यांचा नगररचनेचा अभ्यास आणि पायाभूत सुविधा यांच्या पाठपुराव्यामुळे ते पालिका ते खासदार असा पल्लेदार प्रवास करु शकले. या कामांच्या जोरावर हा मतदारसंघ भाजपाचा गड म्हणून नावारूपाला आला. त्यामुळेच मतदार संघाच्या बाहेर रहाणार्‍या विनोद तावडे यांनी ८० हजार मतांनी निवडून येऊन विधानसभा गाठली होती.

या मतदारसंघात गुजराती, मराठी आणि मारवाडी भाषिकांचे प्राबल्य असून इतर भाषिकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या मतदारसंघातून चार उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या डाव्या आणि उजव्या हात समजल्या जाणार्‍या कार्यकर्त्यांनी ठेंगा दाखवला आहे. भूषण पाटील यांनी गेल्या वेळेस विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी आणि शिवा शेट्टी या दोघांनी यावेळी माघार घेतल्याने सुनील राणे यांचा मार्ग सोपा झाला आहे. शिंपोलीत राहणारे काँग्रेसचे कुमार खिलारे हे स्थानिक असले तरी त्यांचे आव्हान भाजपची अर्धशतकीय वाटचाल थोपवू शकतील अशी सूतराम शक्यता दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -