घरमहाराष्ट्रलांबलेल्या पावसाने उदयनराजेंचा बळी घेतला - जितेंद्र आव्हाड

लांबलेल्या पावसाने उदयनराजेंचा बळी घेतला – जितेंद्र आव्हाड

Subscribe

उदयनराजे यांच्या या पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'यंदाच्या लांबलेल्या पावसाने उदयनराजे यांचा राजकीय बळी घेतला', अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयराजे भोसले यांचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर यात राष्ट्रवादीचा विजय झाला. दरम्यान, उदयनराजे यांच्या या पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात २७ बळी घेतले. साताऱ्यात एक राजकीय बळी घेतला. त्याचं नाव उदयनराजे भोसले’, अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

उदयनराजे भोसले चार महिन्यांपूर्वी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, अवघ्या चार महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजप पक्षात प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभेची जागा मोकळी झाली होती. २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार होते. त्याच दिवशी निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान करायचे ठरवले. अखेर २१ ऑक्टोबर रोजी सातारा विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंचा एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे.


हेही वाचा – ‘आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -