घरमुंबईनऊ तासांची हायहोल्टेज उत्सुकता

नऊ तासांची हायहोल्टेज उत्सुकता

Subscribe

कलानींचा अर्ज वैध, गंगोत्री रणांगणाबाहेर

नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म लावलेला असताना उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे लिहिल्यामुळे कलानी माता- पुत्राच्या उमेदवारी अर्जावर भरत गंगोत्री यांनी हरकत घेतली होती. तब्बल नऊ तासांच्या चर्चेनंतर कलानी परिवाराचा अर्ज वैध ठरवत भरत गंगोत्रीचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मगदूम यांनी 24 उमेदवारांच्या 32 अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू केली. या छाननी प्रक्रियेत भारत गंगोत्री यांनी तीन हरकती नोंदविल्या. त्यामध्ये उमेदवारी अर्ज भरलेल्या कमलेश निकम यांचे ओमी कलानी यांच्या अर्जावर सूचक म्हणून नाव नोंदविण्यात आले होते. त्यामुळे कमलेश निकम आणि ओमी कलानी यांचे अपक्ष म्हणून दाखल केलेले उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी गंगोत्री यांनी केली होती. नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाने भरत गंगोत्री यांना प्रथम एबी फॉर्म दिला होता. तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने जाहीर केलेल्या पक्षाच्या यादीत नाव देखील आले होते. मात्र भाजपने तिकीट नाकारल्यावर यु टर्न मारलेल्या कलानी कुटुंबाने तात्काळ नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म मिळवत गुरुवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देत भरत गंगोत्री यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. तर भाजप उमेदवार कुमार आयलानी, मीना आयलानी, बंडखोर भगवान भालेराव यांच्यासह 19 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. मात्र कलानी परिवारांसबंधीत हरकतींवर रात्री साडे आठ वाजता निर्णय देण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मगदूम यांनी ओमी कलानी, ज्योती कलानी आणि कमलेश निकम यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविले. त्यामुळे आता उल्हासनगर विधानसभेत 23 उमेदवार उरले असून सोमवारी किती उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -