घरमुंबईकल्याण पश्चिमेचा तिढा सुटला....पण टेन्शन कायम !

कल्याण पश्चिमेचा तिढा सुटला….पण टेन्शन कायम !

Subscribe

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ हा भाजपने शिवसेनेसाठी सोडल्याने भाजपची मंडळी नाराजी झाली आहेत. त्याच शिवसेनेकडून बाहेरचा उमेदवार देण्यात येणार असल्याने शिवसैनिकही नाराज झाले होते. मात्र बुधवारी संध्याकाळी शिवसेनेने शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांना एबी फॉर्म दिल्याने शिवसेनेतील तिढा सुटला आहे. दुसरीकडे भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेना टेन्शनमध्ये आहे.

कल्याण पश्चिम मतदार संघ सेनेच्या ताब्यात असतानाही सेनेने दावा केला होता. अखेर ऐरोली आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात सेना भाजपने अदलाबदल केली. त्यामुळे कल्याण पश्चिम हा शिवसेनेला सोडण्यात आला आहे. एकीकडे शिवसेनेला हा मतदार संघ मिळाल्याने स्थानिक शिवसैनिक आनंदात असताना दुसरीकडे अचानक युवा सेनेचे सचिव व आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांच नाव कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी घेतले गेल्याने इच्छूकांची अस्वस्थता वाढली होती.

- Advertisement -

मात्र कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने स्थानिक शिवसैनिकांना उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर लावून धरली होती. अखेर शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना मातोश्रीवरून एबी फॉर्म देण्यात आला आहे. स्थानिक शिवसैनिकांनी मतदारसंघ आणि त्यानंतर उमेदवारीही पटकाविण्यात यश मिळवले आहे. मात्र आमदार पवार हे अजूनही नाराज असून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. ४ ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज सादर करण्याचा निर्णयही पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पवारांनी बंडखोरी केली तर त्याचा फटका शिवसेना उमेदवाराला बसणार आहे. त्यामुळे पवारांचे बंड शांत करण्यात शिवसेना यशस्वी हेाते का ? हेच पाहावे लागणार आहे.

काय आहे इतिहास …

- Advertisement -

२०१४ च्या निवडणुकीत युती व आघाडी न झाल्याने पंचरंगी लढत झाली होती. मोदी लाटेत भाजपचे नरेंद्र पवार हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे शहरप्रमुख विजय साळवी हे २२०० मतांनी पराभूत झाले होते. २००९ मध्ये शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर हे अवघ्या ५ हजार मतांनी पराभूत झाले हेाते. भाजपचे मंगेश गायकर यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचा पराभव होऊन मनसेचे मनसेचे प्रकाश भोईर हे निवडून आले होते. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -