घरमहाराष्ट्रपालघरमध्ये श्रीनिवास वनगा विजयी, सेनेनं बालेकिल्ला राखला!

पालघरमध्ये श्रीनिवास वनगा विजयी, सेनेनं बालेकिल्ला राखला!

Subscribe

श्रीनिवास वनगा यांनी पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय संपादन केला आहे.

लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावितांमुळे ऐन वेळी माघार घ्यावे लागलेले श्रीनिवास वनगा यांनी अखेर विजयाचा बार फोडला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मातोश्रीवरून तिकीट कापण्यात आलेल्या श्रीनिवास वनगा यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने विद्यमान आमदार अमित घोडा यांचं तिकीट कापून निवडणुकीत उभं केलं. पक्षानं ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत श्रीनिवास वनगा यांनी पालघर मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार योगेश नाम आणि मनसेचे उमेदवार उमेश गोवारी यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीवेळी श्रीनिवास वनगा यांना कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात पाठवल्याशिवार राहणार नाही, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. आता ती सत्य ठरली असून श्रीनिवास वनगा यांनी आमदारकीची माळ गळ्यात घातली आहे.


Election Results Nashik Live : विधानसभा मतमोजणी लाईव्ह

श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यामुळे विद्यमान आमदार आणि दिवंगत कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांनी नाराजीतून बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे, अमित घोडा यांनी नाराजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश केला होता. मात्र, अवध्या काही दिवसांतच नाट्यमय घडामोडींनंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. दुसरीकडे पालघरचे शिवसेनेचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर श्रीनिवास वनगा यांनी त्यांच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, शिवसेनेने काँग्रेसमधून आयात उमेदवार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यामुळे श्रीनिवास वनगा तेव्हापासून नाराज होते. मात्र, विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यात आणि आता त्यांना पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यात देखील उद्धव ठाकरेंना यश आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -