घरमहाराष्ट्रएमआयएमने जागावाटपच्या चर्चेची दारे बंद केलीत -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

एमआयएमने जागावाटपच्या चर्चेची दारे बंद केलीत -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Subscribe

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीसोबत जागावाटपाच्या चर्चेची दारे बंद केली आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीत पाणी, बेरोजगारी हे प्रश्न सोडवण्यासाठी उपायोजना करून मतदारांसमोर जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेची निवडणूक ही धार्मिक, भावनिक अशा कोणत्याही मुद्यावर लढविली जाऊ नये. जनतेचे प्रश्न घेऊन आणि मतदारांच्या प्रश्नांवर ठोस उपाय योजना यांचा कार्यक्रम मतदारांसमोर घेऊन गेले पाहिजे. आम्ही समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचा प्रकल्प सत्तेत आल्यावर हाती घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. वीज निर्मिती होणारे कोयना धरण आणि मुळशी धरण येथून वीज निर्मितीनंतर समुद्रात सोडले जाणारे एकूण 80 टीएमसी पाणी हे मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात वळविता येईल.

- Advertisement -

हे काम करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे आहे. त्याचप्रमाणे तापी प्रकल्पातील सुरतमार्गे समुद्रात जाणारे सुमारे 80 टीएमसी पाणी हे उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी वळविले तर या भागातील शेतकर्‍यांवरील दुष्काळाचे संकट कायमचे दूर होऊ शकेल, असा दावा आंबेडकर यांनी केला. पुढील काळात रोजगार निर्मितीचा कार्यक्रम मतदारांसमोर आम्ही मांडणार आहोत, असेही ते म्हणाले.

कोयना आणि टाटा या वीज प्रकल्पातील पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविल्यामुळे वीज निर्मिती वर काही परिणाम होणार नाही. वीज निर्मितीसाठी अणु ऊर्जा, सौर ऊर्जा असे पर्याय उपलब्ध आहेत. देशात सध्या 2.6 टक्के इतकी अतिरिक्त वीज निर्माण होत आहे. ही अतिरिक्त वीज असतानाही विजेचा कृत्रिम तुटवडा केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

एमआयएमने चर्चेची दारे बंद केली आहेत. ती त्यांनी उघडावीत. एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांच्याबरोबर माझे संबंध चांगले आहेत, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -