घरमहाराष्ट्रशरद पवारांना वजा केल्यास अजित पवारांचे स्थान काय? - एन. डी. पाटील

शरद पवारांना वजा केल्यास अजित पवारांचे स्थान काय? – एन. डी. पाटील

Subscribe

शरद पवारांना वजा केल्यास अजित पवारांचे स्थान काय? असा प्रश्न ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत शनिवारी सकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेप्रती राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तरीही राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजित पवार आपल्या मतांवर ठाम आहेत. याउलट शनिवारी त्यांनी आमदारांमार्फत शरद पवार यांना भाजपसोबत चला, नाहीतर राष्ट्रवादी फुटेल, असा सल्ला पाठवला. याच सल्ल्यावनरुन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.


हेही वाचा – महाराष्ट्रात तोडाफोडीचे राजकारण? भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ची जबाबदारी दिग्गजांकडे

- Advertisement -

‘शरद पवार यांच्यासोबतचे त्यांचे नाते हीच त्यांची जमेची बाजू’

‘अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यांचा हा निर्णय चुलते शरद पवार यांच्या राजकीय चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. अजित पवार यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार करायला हवा होता. एकटा अजित पवार काय करू शकतो? हा पवार यांचाच डाव असेल, अशी साशंकता लोकांच्या मनात निर्माण होऊ शकते. अजित यांच्या वागणुकीचा दोष शरद पवार यांना येणार आहे, याचे भान त्यांनी बाळगायला हवे होते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात शरद पवार यांच्यासोबतचे त्यांचे नाते हीच त्यांची जमेची बाजू आहे. त्यांना वजा करून अजित यांचे स्थान काय राहते? याचेही आत्मचिंतन त्यांनी या निमित्ताने करायला हवे’, अशा शब्दांत एन. डी. पाटील यांनी टीका केली.


हेही वाचा – अजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीला अपयशच

- Advertisement -

 

‘शरद पवार यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे’

‘भाजप-शिवसेने सर्वात अगोदर सत्तास्थापनेचा घोळ घातला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांनी टोकाची भूमिका घेतली. अशी भूमिका अजित पवारांनी घ्यायला नको होती. मात्र, आता शरद पवार यांनी आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहावे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घेऊन राजकीय पाऊल टाकण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यातून माघार घेऊ नये’, असे प्रा. पाटील म्हणाले. त्याचबरोबर ‘अजित पवार यांची शरद पवार यांनी कोणतीही गय करु नये’, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -