Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार २० जागा; चंद्रकांत पाटलांचा हिशोब

काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार २० जागा; चंद्रकांत पाटलांचा हिशोब

Related Story

- Advertisement -

“लोकसभा निवडणुकीमध्येच विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले होते. महाराष्ट्रात सरकार येण्यासाठी १४४ जागा लागतात. मात्र लोकसभेला भाजपला २२७ मतदारसंघात मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे विधानसभेत आमचे सरकार येणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २० जागा येतील. त्यामुळे विरोधकांना केंद्राप्रमाणेच इथेही विरोधी पक्षनेता मिळणार नाही”, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कोल्हापूरच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांनी आज अस्तित्वाची लढाई सुरु केली असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांना विश्रांती देऊ

या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातून कायमची निवृत्ती देऊ, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. मला कोथरुडमध्ये अकडवून ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवारच मिळाला नाही, असेही ते म्हणाले.

पाटील यांनी कोल्हापूरातून लढायला हवे होते – पवार

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एबीपी माझा या वाहिनीवर मुलाखत देताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून निवडणूक लढविण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या कोल्हापूरातून उतरवून दाखविले पाहीजे होते किंवा कोल्हापूरमधील आजुबाजूच्या जिल्ह्यातून उभे राहायला हवे होते. मात्र त्यांनी सुरक्षित मतदारसंघ निवडला. पाटील कोथरुड सोडून पुण्यातील इतर ठिकाणी का उभे राहिले नाहीत? अंत्यत सोयीच्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे हे काही अवघड नसते, अशी टीका पवार यांनी केली होती.

- Advertisement -