घरमहाराष्ट्रमोदींनी 'या' नेत्यांसाठी घेतल्या होत्या सभा; तरीही आले अपयश

मोदींनी ‘या’ नेत्यांसाठी घेतल्या होत्या सभा; तरीही आले अपयश

Subscribe

मोदींच्या सभेनंतर आणि भाजपाची निवडणुक रणनिती फोल ठरल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा

विधानसभा निवडणूक २०१९ करिता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या उमेदवाराचे शक्ती प्रदर्शन करत या निवडणूकीच्या रिंगणात सर्वच दिग्गज नेते मंडळी उतरले होते. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर प्रचार सभा घेतल्या होत्या. भाजपाच्या उमेदवारी प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: महाराष्ट्रात दाखल होत एकूण ९ प्रचार सभा घेतल्या होत्या.

भाजपाची निवडणुक रणनिती ठरली फोल

राज्यातील पहिली प्रचार सभा १३ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे झाली असून भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे १३ ऑक्टोबर रोजी तर १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अकोला, पनवेल आणि परतूर येथून मतदारांनी मतं देण्यासाठी आवाहन केले. तसेच १७ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळी येथे प्रचार सभा घेत १८ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये प्रचारसभा घेत या दौर्‍याची सांगता त्यांनी केली होती. मात्र, यावेळी नरेंद्र मोदींनी सभी घेऊन देखील भाजपाचे विद्यमान आमदार असलेले पंकजा मुंडे आणि नुकतेच भाजपात पक्षांतर करून आलेले उदयनराजेंचा विधानसभा निवडणुकीत चांगला पराभव झाल्याने पदरी निराशा आली आहे. मोदींच्या सभेनंतर आणि भाजपाची निवडणुक रणनिती फोल ठरल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

- Advertisement -

पराभव झाल्याने धक्का

विधानसभा निवडणुकीच्या आधी मोदींनी परळी आणि बीड मधील उमेदवारांकरता सभा घेतली होती. या सभा झाल्यानंतर साताऱ्यातील उदयनराजे आणि विधानसभेच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली होती. या उमेदवारांना जास्तीत जास्त मतं देऊन बहुमताने विजयी करण्याचे आवाहन साताऱ्यातील जनतेला देखील केले होते. मात्र त्यांच्या पदरी केवळ अपयश आल्याने या दोन्ही जागेवर भाजपाचे उमेदवारांनी धक्का बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -