घरमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकरांची भावनिक पोस्ट; 'संघर्षातून उभे राहिलो, हक्कांसाठी लढत राहू'

प्रकाश आंबेडकरांची भावनिक पोस्ट; ‘संघर्षातून उभे राहिलो, हक्कांसाठी लढत राहू’

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार जिंकून आला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय बोलतील? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

आपण सर्व संघर्षातून उभे राहिलो आहोत. यापुढेही वंचित, शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार जिंकून आला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय बोलतील? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली. आपण जिंकू शकलो नाहीत तरीही १० जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अनेक ठिकाणी आपण जोरदार टक्कर दिली. यापुढेही लढत राहू, असे आंबेडकर म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करणाऱ्या २४ लाख मतदारांचे आभारही मानले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

‘महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार! वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २४ लाखांपेक्षा जास्त मते मिळवली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद! आपण जिंकू शकलो नाही, तरी १० जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अनेक ठिकाणी आपण जोरदार टक्कर दिली व तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आपण सर्व संघर्षातून उभे राहिलो आहोत. यापुढेही वंचित, शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू! आगामी काळात वंचित बहुजन आघाडी राज्याच्या राजकारणात त्याच ताकदीने उभी राहील. जनतेच्या मबलभूत प्रश्नांवर, सामाजिक, राजकीय न्याय, हक्कांसाठी आपण लढतच राहू’, असे प्रकाश आंबेडकर ट्विटरवर म्हणाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – लांबलेल्या पावसाने उदयनराजेंचा बळी घेतला – जितेंद्र आव्हाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -