घरमहाराष्ट्रचंद्रावर रॉकेट पाठवून युवकांचं पोट भरत नाही - राहुल गांधी

चंद्रावर रॉकेट पाठवून युवकांचं पोट भरत नाही – राहुल गांधी

Subscribe

'चंद्रावर रॉकेट पाठवून युवकांचं पोट भरत नाही',अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लातुरच्या औसा शहरात केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लातुरच्या औसा शहरात पहिलीच जाहिर प्रचार सभा घेतली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी भाषणाची सुरूवातच ‘कर्ज माफी झाली का’? असा प्रश्न विचारत केली. तसेच ‘महाराष्ट्रात वाढलेली बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अच्छे दिन, बंद झालेले कारखाने’, अशा विषयांना केंद्रीत करुन राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, ‘कोणत्याही तरुणाला विचारलं की काय करता तर काहीच नाही बेरोजगार आहे’, असं सांगतात. त्याचप्रमाणे शेतकरीही मोदींनी वाट लावली’, असं सांगतात.

राहुल गांधी यांची औसात झालेली ही पहिलीच सभा आहे. भाषणाच्या सुरूवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. ‘पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील मुळ मुद्द्यांवरुन प्रश्न हटवण्याचा प्रयत्न करतात. तर नोटाबंदीचा सर्वात जास्त त्रास गोरगरीबांना झाला. बँकांच्या रांगेत फक्त गोरगरीब उभे होते. तसंच, कर्ज बुडवून पसार होणाऱ्या नीरव मोदी, राहुल चोक्सी यांचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली नाही’, असा प्रश्न ही राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

रॉकेट पाठवून युवकांचं पोट भरत नाही

‘जीएसटी लागू केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली. चंद्रावर विमान पाठवून महाराष्ट्रातील युवकांचं पोट भरत नाही’, असं म्हणत चांद्रयांनच्या मोहिमेवरही टिकास्त्र सोडलं. देशातील उद्योजकांना साडे पाच लाखांचं कर्ज माफ झाले शेतकऱ्यांना काय मिळालं? पण, याचा कुठे उल्लेखही होत नाही असं म्हणत मीडियावर सडकून टीका केली. काश्मीर ३७०, चांद्रयान या विषयांवरुन मोदी सध्या प्रचार करत आहेत. मुळ मुद्यांना बगल देण्यासाठी सतत ३७० कलमाचा उल्लेख केला जातो. करबुडव्यांना कोणत्याही कारवाईची भीती नसल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राच्या हृदयात काँग्रेसची विचारधारा

‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार असल्याचे सुतोवाच ही राहुल गांधींनी दिले. काँग्रेस पक्षाचा पाया महाराष्ट्रातून घातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राच्या हृदयात काँग्रेसची विचारधारा बसली आहे. जे बोलतात ते करतात, असं म्हणत राहुल गांधींनी औसातील प्रचारसभेत मोदींवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -